Ad will apear here
Next
मार्गस्थ (भाग १)
महानुभाव पंथातील प्रसिद्ध बा. भो. शास्त्री यांच्या आत्मचरित्राचा हा पहिला भाग आहे. महानुभाव पंथाच्या चाकोरीच्या आत आणि बाहेर त्यांनी मुक्त संचार केला. महानुभाव पंथ ते अक्षरशः जगले. साहजिकच पंथहिताच्या दृष्टीने जे योग्य आहे, ते सर्व या पुस्तकात आले आहे. मात्र, त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केला. आयुष्यातील खाचखळगे पार केले, हा सर्व भाग त्यांच्या आत्मचरित्रात वाचायला मिळतो.

महानुभाव जेव्हा आयुष्यात आला, तेव्हा जीवनाला कसे वळण मिळाले, ते त्यातून दिसते. डोंगरगावातील बालपण, तेथील माणसे, भगवद् गीता, महानुभाव होणे अशा टप्प्यांमधून हा प्रवास सुरू होतो. भिक्षापात्र हाती घेतल्यानंतरचे कौटुंबिक आयुष्य, संन्यास, लेखन, सप्ताह, व्याख्याने, प्रवचन, दीक्षा महोत्सव, धर्मसभा आदींविषयीचा मजकूर वाचायला मिळतो.

प्रकाशक : आदित्य प्रकाशन
पाने : १५२
किंमत : २०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZOQBI
Similar Posts
मौनाची गुपिते उलगडणारी आत्मकथा महानुभाव पंथाच्या बा. भो. शास्त्री यांचे ‘मार्गस्थ’ हे आत्मचरित्र औरंगाबादच्या आदित्य प्रकाशनाने दोन भागांत प्रकाशित केले आहे. ‘मार्गस्थ’ हा केवळ ‘स्व’चा शोध नाही, तो माणूसपणाचाही शोध ठरतो. महानुभावांनी अनुसरलेल्या ज्ञानमार्गाच्या वाटचालीची सद्यस्थिती त्यातून ध्यानात येते. एक उपदेशी, एक साधक, एक महंत कसा घडतो हे या आत्मकथेतून डोकावत राहते
वास्तवाला भिडणारी कविता सनदी अधिकारी असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन काव्यसंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. या काव्यसंग्रहांची ही ओळख...
अशा तुडविल्या काटेरी वाटा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीच्या जोखडातून मुक्त केलेला उपेक्षित समाज आज सन्मानाने जगतो आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात तो प्रगती करीत आहे. आर. के. जुमळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची कास धरली आणि खेड्यातील आयुष्य झिडकारून टाकले. हा सर्व प्रवास म्हणजे बाबासाहेबांचे ऋण आहे., असे मानीत त्यांनी
‘आकांत शांतीचा’... सामाजिक क्रांतीचा! प्रशासकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘आकांत शांतीचा’ हा कवितासंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. डॉ. भापकरांच्या या काव्यसंग्रहातून सौंदर्यपूर्ण काव्याने ओतप्रोत असलेल्या शब्दांची शृंखला उलगडत जाते. या काव्यसंग्रहाबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language